Label

व्यावसायिक सुविधा :


सर्व व्यवसायासाठी आवश्यक असणारे लायसन्स व परवाने : 

💢 शॉप ऍक्ट लायसन 

नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो.
व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते. शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.

शॉप अधिनियम / व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, व्यवसाय दुकानाचा फोटो 

💢 फूड  लायसन 

ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ ची विक्री केली जाते किंवा खाद्य पदार्थ बनविले जातात (उदा.हाॅटेल,किराणा दुकान, घरगुती खाद्य उत्पादन, दुग्धजन्य व्यवसाय, तेल घाना, चायनीज, पाणीपुरी, मिठाई, बेकरी, Repacking,... ईत्यादी..) त्या सर्वांना FSSAI फुड लायसन्स असणे बंधनकारक आहे.खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता Food Safety and Standard Authority of India (FSSAI) यांचे व्यवसाय मान्यता प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.
अशा परवानगी शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे,साठविणे,उत्पादन करणे बेकायदेशीर असून अशी बेकायदेशीर कृती करणारांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात.यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण (FSSAI) हे खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देवू करतात.
हा परवाना १ ते ५ वर्षांसाठी मिळू शकतो .

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, ज्या जागेत व्यवसाय करत असेल त्या जागेचा उतारा किंवा लाईटबील (जागा भाड्याने असल्यास संबधीत मालकाचे समंती पत्र 

💢 आधार उद्यम सर्टिफिकेट : 

ज्यांनी नवीन व्यवसाय उद्योग सुरू केला आहे आणि व्यवसायाची शासन दप्तरी नोंदणी करण्यासाठी उद्योग आधार नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासनाच्या MSME (लघु सुक्ष्म मध्यम) खात्याच्या उद्योगांसाठी असणाऱ्या विविध योजना व अनुदान, बॅकेंत आपल्या व्यवसायाचे Current Account उघडण्यासाठी व मुद्रा लोन व ईतर कर्ज घेण्यासाठी उद्योग आधार नोंदणी असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक 


तसेच विविध व्यवसायासंबधी लागणारे सर्व परवाने लायसन काढून मिळतील. 

 


 

No comments:

Post a Comment